सासू आणि सून ( Mother-in-law and daughter-in-law )…..!!
सासू आणि सून ( Mother-in-law and daughter-in-law )…..!!
सासू आणि सून ( Mother-in-law and daughter-in-law )…..!!
सासू आणि सून ( Mother-in-law and daughter-in-law )…..!!
सासू आणि सुनेचं नातं हे असतंच जगावेगळं…… !!
माप ओलांडून सून घरात येते आणि सासू आपली जागा सोडून सुनेला देते, कष्टाने उभारलेल्या संसाराची किल्ली तिच्या हातात देते. आता हि किल्ली आपण कशा पद्धतीने जपायची हे मात्र सुनेवर अवलंबून असते.
पण सगळ्याच सासू आप ली जागा सुनेला देतात असं नाही बरं का, काही सासू, ‘हा संसार, हे घर माझं आहे, मी बड्या कष्टाने उभारलंय, सुनेने मी म्हणेन तसचं वागलं पाहिजे, मी सांगेन तेच केलं पाहिजे अश्या विचारांच्या सुद्धा असतात.
आणि त्यात जर एखादी सासू जाचक स्वभावाची असेल तर सुनेची चंगळ उडालीच म्हणून समजा…..
आजकालच्या तरुणींसमोर लग्न म्हणजे एक चित्र उभं राहतं , ते म्हणजे मी आणि माझा hubby ,म्हणजे नवरा ज्याला आपण लाडाने hubby म्हणतो आणि आपला छानसा संसार एवढंच . बरं मग त्याचे ( म्हणजे नवऱ्याचे ) आई वडील.. ?..?
आम्हा तरुणींना मुळी सासूची लुडबुड नकोच हवी असते मग कशाला हवा तिचा विचार नाहीका..!!
आता यात पण सगळ्याच तरुणी असा विचार नाही करत . आपल्याला सासू असेल तर, तिचा हातभार लागेल, आपल्या चुका समजावून सांगेल, आणि आपल्याला चांगला मार्गही दाखवेल अशाही काही असतात. आणि त्याच संसारासाठी स्वतःला ताकासारखा घुसळतात. आपल्या सासूच्या सुखासाठी तिच्या सारखं वागायचा प्रयत्न करतात आणि आपसूकच तिच्यातले गुण सूनेमध्ये उतरू लागतात…..
एक घर म्हटलं कि भांड्याला भांडा लागतो या म्हणी प्रमाणे सासू -सून म्हटले कि शब्दाला शब्द लागलाच पाहिजे त्याशिवाय या नात्याची ओळख अधुरीच म्हणायची.
मुख्य म्हणजे यांना भांडणासाठी एक particular topic ची गरज असते असं नाही. त्या कोणताही शुल्लक गोष्टीवरून सुद्धा भांडू शकता. अगदी जेवणातील मिठापासून, ते सुनेच्या माहेरच्या माणसांपासून , ते सासूच्या जुनाड , बोगस विचारापर्यंत.. आणि एवढ्यातच यांचं फावत नाही बरं का.! प्रत्येक भांडणात मागच्या पुढच्या अगदी लग्न झाल्यापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर पडतात.
काहींच्या घरी तर वेगळीच अवस्था बघायला मिळते. “भांडल्याशिवाय जमेना आणि तुजवाचून करमेना.”
गंमत म्हणजे या सगळ्यात सँडविच होतं ते त्या नवऱ्याचं. त्याला दोघीही हव्या असतात, बायकोही आणि आई सुद्धा. पण करणार काय , कोणाला बोलणार तो… बिच्चारा …. .!!
काय मग कसला विचार करताय… ? आपण कुठल्या गटात बसतो याचाच ना… मैत्रिणींनो , गट कोणताही असो तो विचार न करता, सुनेने आपल्या सासूकडे एक आईच्या नजरेने पहिले आणि ती जे बोलते ते आपल्या आईच्या मुखातून निघतेय असा विचार केला आणि सासूने आपल्या सुनेचे वागणे मुलीप्रमाणे समजावे, हा विचार केला तर दोघीही सुखाने नांदतील, संसार आनंदाने फुलेल आणि बघा लक्ष्मी कशी नाचत घरी येईल.
फक्त गरज आहे ती understanding ची…….. !!!
The relationship between mother-in-law and daughter-in-law is quite different….!!
Originally published at https://bestrelationshipwishes.blogspot.com on May 31, 2020.
메타데이터
- post_id
- 19eb8a5528fb
- slug
- सासू-आणि-सून-mother-in-law-and-daughter-in-law-19eb8a5528fb
- url
- https://medium.com/@poonam-kamble493/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-mother-in-law-and-daughter-in-law-19eb8a5528fb
- canonical_url
- https://medium.com/@poonam-kamble493/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-mother-in-law-and-daughter-in-law-19eb8a5528fb
- author_url
- https://medium.com/@poonam-kamble493
- status
- ok
- fetched_at
- 2026-07-29 01:30:10