थोडंसं तुळशी विषयी…
तुळशी माते तुला वंदन!
थोडंसं तुळशी विषयी…
नमस्कार🙏
“तुळस वंदावी माऊली,संतांची सावली…”
आज थोडंसं तुळशी विषयी बोलूया.

तुळस.
तुळस ही एक आयुर्वेदीक वनस्पती आहे. तिला औषधी वनस्पतींची राणी असेही म्हणतात. ही बहुगुणी म्हणजेच बऱ्याच आजारांवर रामबाण औषध आहे.
नैवेद्य दाखविताना त्यावर तुळशीचे एक पान ठेवतात. रोज रिकाम्या पोटी तुळशीची पाने सेवन केल्यास पित्त कमी होते. आपण रोज तुळशी समोर आसन घालून काही वेळ बसलो तर श्वसनासंबंधीचे आजार दूर होतात. अंगातील उष्णता कमी करण्यासाठी तुळशीचा रस पितात. पाणी शुद्धीकरण्याचे कामही तुळस करते.

अशी ही बहुगुणी तुळस प्रत्येकाच्या दारात असणे महत्त्वाचे आहे. आपल्याला कोणते संकट यायचे असेल तर हे झाड सुकते. रोज इतर झाडांप्रमाणे तुळशीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. रोज तिला पाणी घालून तिची पूजा केली पाहिजे. त्यामुळे घरातले क्लेश, दु:ख, दारिद्र्य नाहिसे होऊन सुख समृद्धी नांदते.
दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशीला तुलसी विवाह करतात.परंतु पौर्णिमेपर्यंतही विवाह केले जातात. आपण विवाह करतो त्याप्रमाणे सर्व विधी करतात. आपल्या देवघरातील बाळ कृष्णाच्या मूर्ती बरोबर विवाह लावतात. मंडप, रंगरंगोटी, हळद,पिवळे वस्त्र,अंतरपाट,मंगलाष्टके, लाडू चिवडा, पोहे, नैवेद्य, चिंच आवळे सार काही साग्रसंगीत करतात. कोकणात तुळसी विवाह खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

तुळशी माते तुला वंदन. 🙏🏻
धन्यवाद.
메타데이터
- post_id
- 499688735a7d
- slug
- थोडंसं-तुळशी-विषयी-499688735a7d
- url
- https://medium.com/@sandhyawakde/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-499688735a7d
- canonical_url
- https://medium.com/@sandhyawakde/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-499688735a7d
- author_url
- https://medium.com/@sandhyawakde
- status
- ok
- fetched_at
- 2026-07-22 04:47:18