← Back to list

मेंढपाळाच्या घरातून उभा राहिलेला संघर्ष… प्रेरणादायी प्रवास डॉ. सचिन मोटे सरांचा..!

सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेली विभुतवाडी… दुष्काळ, गरीबी आणि संघर्ष याशिवाय फारशी ओळख नसलेली ही छोटीशी वाडी. पण याच मातीत…

Sandip Patil · 2026-05-27 11:13 · 0 claps · 1.3 min read
#dr-sachinmote #education #hard-work #irs #success-story
Open on Medium ↗
Wiki topics: EDU · Education & Learning

मेंढपाळाच्या घरातून उभा राहिलेला संघर्ष… प्रेरणादायी प्रवास डॉ. सचिन मोटे सरांचा..!

सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेली विभुतवाडी… दुष्काळ, गरीबी आणि संघर्ष याशिवाय फारशी ओळख नसलेली ही छोटीशी वाडी. पण याच मातीत जन्मलेल्या एका मेंढपाळाच्या मुलाने जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत सहाय्यक आयकर आयुक्त (IRS) पदापर्यंत मजल मारली आणि संपूर्ण राज्याला प्रेरणा दिली. हे नाव म्हणजे डॉ. सचिन मोटे. घरात अठराविश्व दारिद्र्य… वडिलांचा मेंढपाळाचा व्यवसाय… केवळ शंभर मेंढ्यांवर चालणारा संसार… वर्षातील सहा महिने कुटुंबासोबत स्थलांतर… अशा कठीण परिस्थितीतही डॉ. सचिन मोटे यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. अनेक वेळा परिस्थितीने पाय खेचण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी हार मानली नाही. “दारिद्र्याला हरवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही,” हा विचार मनात ठेवून त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला.

गावातील साध्या शाळेतून सुरू झालेला हा प्रवास बारावीतील गुणवत्ता यादी, मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल आणि अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यशापर्यंत पोहोचला. एका मेंढपाळाच्या मुलाने अधिकारी होऊन दाखवलं… आणि गावखेड्यातील हजारो मुलांच्या डोळ्यात नवं स्वप्न पेटवलं. आजही ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांमध्ये गरीबी, दुष्काळ आणि शिक्षणाची अडचण आहे. पण डॉ. सचिन मोटे यांचा प्रवास सांगतो — परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द मोठी असेल तर यशाचा रस्ता नक्की तयार होतो. “गावात जन्मलेलं पोरगं साहेब होऊ शकतं,” हा आत्मविश्वास त्यांनी संपूर्ण युवकांना दिला. डॉ. सचिन मोटे यांचे यश हे केवळ एका व्यक्तीचे यश नाही, तर संघर्ष करणाऱ्या प्रत्येक ग्रामीण युवकाचे स्वप्न आहे. मेंढपाळाच्या घरातून निघालेला हा प्रवास आज हजारो तरुणांसाठी प्रेरणेचा दीप बनला आहे. धनगर समाज हा संघर्षातून उभा राहिलेला समाज आहे. या समाजाने कष्टातून इतिहास घडवला आहे. डॉ. सचिन मोटे यांनी शिक्षणाच्या बळावर प्रशासनात मोठं स्थान मिळवत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. एका छोट्याशा वाडीतून सुरू झालेला संघर्ष आज लाखो युवकांना दिशा देत आहे. कारण डॉ. सचिन मोटे यांनी सिद्ध करून दाखवलं — परिस्थिती गरीब असली तरी स्वप्नं गरीब नसतात.

메타데이터
post_id
ab2cf0f6f8a3
slug
मेंढपाळाच्या-घरातून-उभा-राहिलेला-संघर्ष-प्रेरणादायी-प्रवास-डॉ-सचिन-मोटे-सरांचा-ab2cf0f6f8a3
url
https://medium.com/@press_49853/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-ab2cf0f6f8a3
canonical_url

author_url
https://medium.com/@press_49853
status
ok
fetched_at
2026-06-09 15:37:30